मुंबई : सेलिब्रेटी आर्टिस्ट हायरमेकिंग कॉस्ट या पेक्षा मराठी प्रेक्षकांना बघायला आवडते ती चांगली गोष्ट त्या मुळेच करोडो रुपये खर्च करून केलेले मराठी सिनेमे केवळ गोष्ट चांगली नसल्या मुळे सपशेल अपटलेले कितीतरी उदाहरण आहेत या उलट नवीन कलाकार असलेले कमी मेकिंग कॉस्ट असलेले कितीतरी सिनेमे गोष्टी च्या जीवावर यशस्वी झाले आहेत अशीच एक सुंदर गोष्ट असलेला सिनेमा 'पिटर' 22 जानेवारीला आपल्या भेटीला येत आहे. जीव मग तो प्राण्याचा असला तरी प्रेम, भावना सारख्याच असतात त्यांना इजा केली तर त्रास आपल्या सारखाच होतो फक्त त्यांना बोलून दाखवता येत नाही विरोध करता येत नाही त्या मुळे मनुष्यप्राण्याच्या पारंपरिक प्रथांना यांचा हकनाक बळी पडतो. अशाच बळी पडलेल्या पिटरची आणी धन्याच्या मैत्रीची भावनिक गोष्ट म्हणजे 'पिटर' 22 जानेवारी 2021 ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या नवीनवर्षात प्रदर्शित होणारा हा पहिला मराठी सिनेमा आहे त्या मुळे या सिनेमाला भरभरून प्रतिसाद द्या अशी निर्माता, दिग्दर्शक अमोल अरविंद भावे यांची सर्व प्रेक्षकांना विनंती आहे. 'आनंदी इंटरप्रायझेस' ची ही पाहिली निर्मिती असून सेव्हन कलर्स सिनेव्हिजन आणि हिंदी इंडस्ट्री मधील नामांकित निर्मिती संस्था आणि डिस्ट्रीब्यूशन कंपनी 'जम्पिंग टोमॅटो' हा चित्रपट प्रेझेंट करत आहे. दिप्पांकर रामटेके, प्रितेश किर्तीकुमार शहा आणी रोहनदीप सिंग हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तसेच या चित्रपटाला सुरेल संगीत 'श्री गुरुनाथ श्री' या संगीतकाराने दिले असून गीत लेखनाची जबाबदारी रंगनाथ गजरे, विष्णू थोरे यांनी पार पाडली आहे ही सुंदर गाणी सई जोशी व ज्ञानेश्वर मेश्राम या गोड गळ्याच्या गायकांनी गायली आहेत. या चित्रपटाचे छायाचित्रण साऊथ चे प्रसिद्ध सिनेमोटोग्राफर अमोश पुटीयाथील यांनी केले आहे. चित्रपटाचे लेखन राजेश भालेराव, संकलन किशोर नामदेव, कला दिग्दर्शन रमेश कांबळे, साऊंड ऋषिकेश मोरे, नृत्य दिग्दर्शक नील कामळे, निर्मिती प्रबंधक भक्ती वरणकर, रंगभूषा आरती बोरसे, वेशभूषा मिलन देसाई, सहायक दिग्दर्शक योगेश मोटे, सुरज मरचंडे, सुरज पानकडे, राहुल पांचाळ, कलाकार प्रेम बोराडे, मनीषा भोर, सुरेश ढगे, अमोल पानसरे, विनिता संचेती, सिद्धेश सिध्देश्वर, शरद राजगुरू, प्रमेय वाबळे, उमेश पांढरे, मल्हारी ठिकेकर यांनी काम केले आहे. चावंड गावच्या निसर्गरम्य गावात या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. मनोरंजन करता करता अंधश्रद्धेवर प्रकाश टाकणारा हा भावनिक सिनेमा शेवटी प्रेक्षकांना सिनेमातून मांडलेल्या मुद्यावर विचार करायला लावेल अशी संपूर्ण टीम ला आशा आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment